‘मंथन स्किल्स डेव्हलपर’ द्वारे श्रीमती. मनीषा सबनीस व त्यांच्या अनुभवी चमूमार्फत अनेक प्रशिक्षण कार्यक्रम व शिबिरे आयोजित केली जातात. नजीकच्या काळात आयोजित केलेली शिबिरे.
कार्यशाळा/ शिबिरे :
१. ‘वयात येताना’ कोणासाठी: ८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. तपशील: वयात येताना होणारे शारीरिक मानसिक बदल, शरीरशास्त्र, प्रेम-आकर्षण मधला फरक, नकार देणे व नकार स्विकारण्याची पद्धत, करिअर म्हणजे काय? कालावधी: ६ तास प्रशिक्षक: २ , मदतनीस : १ शिबिरार्थी: किमान २० |
|
२. ‘स्वतःला ओळखा’ कोणासाठी: फक्त स्ञीयांसाठी. तपशील: स्वतःची ओळख, ऑरगॅझम म्हणजे काय?, शरीर व मनाचा संबंध, जोडीदाराशी खुला संवाद, शरीर व मनाची काळजी, चारित्र्य-नितीमत्ता, मित्र, इ. विषयांवर गाणी व गप्पांद्वारे सादरीकरण. कालावधी: २-३ तास. प्रशिक्षक: ३ |
|
३. ‘लग्न कशासाठी’ कोणासाठी: विवाहेच्छुक स्ञी-पुरुषांसाठी. तपशील: लग्न कशासाठी? स्ञी-पुरुषांचे भिन्नत्व, तरीही समानता (we are not same but equal), अपेक्षा – समजुती- विचार, इ., आमची वेगळी पत्रिका, समारंभ का? कालावधी: ३ तास |
|
|
४. ‘जगा आनंदाने’ कोणासाठी: जेष्ठ नागरिकांसाठी. तपशील: जेष्ठ नागरिकांसाठी REBT based – ‘जगा आनंदाने’. कालावधी: २ तास प्रशिक्षक: १ शिबिरार्थी: किमान १० |
५. ‘REBT एक नवी सुरुवात’ कोणासाठी: सगळ्यांसाठी तपशील: ‘जगण्याची एक Rational पद्धत-एक नवी सुरुवात’ (Introduction of REBT). कालावधी: १ दिवस. प्रशिक्षक: २ शिबिरार्थी: किमान १६ |
|
६. ‘संतापात ताप करू त्याचा निःपात’ कोणासाठी: सगळ्यांसाठी तपशील: रागावर नियंत्रण कसे करावे? (Anger Management). कालावधी: ४ तास प्रशिक्षक: १ शिबिरार्थी: किमान १० |
|
७.‘चालढकली’ च्या ढकलगाडीला ढकलुन द्या; आजचे काम आजच करा’ कोणासाठी: अधिकारी, उद्योजक, गृहिणी व इतरांसाठी तपशील: कामे त्वरित हातावेगळी करा व तणावमुक्त व्हा. चालढकलीच्या जीर्ण सवयीला कायमचा राम-राम ठोका. (Procrastination वरील कार्यशाळा) कालावधी: ४ तास प्रशिक्षक: १ शिबिरार्थी: किमान १० |
|
८. ‘चिंता’- एक समस्या कोणासाठी: उच्च-पदस्थ अधिकारी, नेतेमंडळी तसेच सगळ्यांसाठी तपशील: ‘चिंता’ ही समस्या दूर करण्यासाठी REBT द्वारे उपाययोजना. कालावधी: ४ तास प्रशिक्षक: १ शिबिरार्थी: किमान १० |
|
९. ‘REBT बद्दल बरेच काही’ कोणासाठी: सगळ्यांसाठी. तपशील: ‘REBT बद्दल बरेच काही’, ‘जीवन जगण्याची एक Rational पद्धत’. कालावधी: २ दिवस प्रशिक्षक: ३ शिबिरार्थी: किमान १६
|