संस्थेविषयी माहिती

कार्य व स्वरूप:-

‘मंथन स्किल्स डेव्हलपर’ संस्थेमार्फत किशोरवयीन मुला–मुलींसाठी, फक्त स्ञीयांसाठी, विवाहेच्छुक स्ञी-पुरुषांसाठी, एकट्या स्ञी-पुरुषांसाठी, जेष्ठ नागरीकांसाठी, मानसिक व शारिरीकदृष्ट्या संपन्न नातेसंबंधासाठी अनेक कार्यशाळा, व्याख्याने, चर्चासत्रे, प्रशिक्षण वर्ग इ. घेण्यात येतात. या अंतर्गत प्रेम आणि आकर्षण ह्यामधला फरक, लग्नासाठी/लग्नाबद्दल स्ञी-पुरुषाचे भिन्न दृष्टीकोन, नातेसंबंधाबाबतच्या गैरसमजुती नी अंधश्रद्धा, रोजच्या जगण्यातल्या मानसिक अडचणी, त्रासदायक भावना, त्यामागचे विचार व ते बदलण्यासाठी REBT चा उपयोग इ. विषयांचा समावेश असतो.

संस्थेमार्फत गेल्या १६ वर्षात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, अंबेजोगाई, अमरावती, यवतमाळ, इ. अनेक ठिकाणी हे काम करण्यात आले आहे. याशिवाय वैयक्तिक पातळीवर समुपदेशनही करण्यात येते. आजपर्यंत सुमारे २००० लोकांनी याचा लाभ घेतला आहे.

स्थापना- सन २०००